आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:सौंदाळा येथील चिमुरडीच्या खून प्रकरणातील आरोपीस जन्मठेप

नेवासेएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सौंदाळा येथील चिमुरडीच्या खून प्रकरणातील आरोपी आप्पासाहेब नानासाहेब थोरात यास विशेष न्यायाधीश जी. बी. जाधव यांचे न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. विशेष सरकारी वकील देवा काळे यांनी सरकार पक्षाच्या वतीने खटल्याचे कामकाज पाहिले.सौंदाळा येथील मामाकडे आरोपी आप्पासाहेब थोरात हा आयटीआयचे शिक्षण घेण्यासाठी आलेला होता. मामाच्या घराशेजारी राहणाऱ्या नात्यातील अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढुन तिच्याशी लगट करून प्रेमसंबंध प्रस्तापित करू पाहत होता. आरोपीच्या तथाकथित प्रेमाबाबत मामाला समजले तर मामा आरोपीवर रागवेल, आरोपीला सौंदाळा येथून कायमचे काढून देईल. म्हणून आरोपीने मामाच्या लहान मुलीचा कायमचा काटा काढून प्रेमातील अडसर दूर करण्याचे ठरवले.

२० जून २०२० रोजी साडेनऊच्या सुमारास आरोपीने मामाच्या लहान मुलीच्या पायथ्याजवळ पडलेला रग उचलून तिच्या तोंडावर टाकून तिला ठार केले. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. गुन्ह्याचा तपास तत्कालीन नेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे साहेब यांनी करून आरोपी विरुध्द दोषारोपपत्र विशेष न्यायालयात दाखल केले. या खटल्याची सुनावणी नेवासे येथील विशेष न्यायालयासमोर झाली.

या खटल्यात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष सरकारी वकील देवा काळे यांनी सरकार पक्षाच्या वतीने केलेला युक्तिवाद व सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांचे सादर केलेले महत्त्वपुर्ण न्यायनिवाडे विशेष न्यायालयाने ग्राहय धरून आरोपीस दोषी ठरविले. विशेष न्यायालयाने आरोपी अप्पासाहेब नानासाहेब थोरात यास जन्मठेप तसेच ५००० रुपये दंड, व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी, ३ वर्ष सश्रम कारावास व १०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास नउ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.

बातम्या आणखी आहेत...