आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तक प्रकाशन:आयुष्य हे प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचे रणांगण; अॅड.उज्वल निकम यांचे प्रतिपादन

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती मोठी असते. आमदार संग्राम जगताप यांच्याकडे अशी मनाची श्रीमंती आहे. राजकारणात प्रत्येक टप्प्यावर यश मिळतेच असे नाही. काही वेळा एखाद्या प्रकरणात खोटे आरोपही केले जाऊ शकतात. अशावेळी डगमगता कामा नये. आयुष्य हे प्रतिकुल परिस्थितीत झुंज देण्याचे रणांगण आहे, ही खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे. कायद्यातील तरतुदींचा गैरवापर नगर जिल्ह्यात केला जातो याची अनेक उदाहरणे आहेत. म्हणून कायदा वाईट नसतो तर तसा दुरुपयोग करणारे वाईट असतात, असे प्रतिपादन सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांनी केले.

आमदार संग्राम जगताप यांच्या विधानसभेतील कार्यकाळास ८ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी नगर शहरात केलेल्या विकासकामांचा आढावा घेणाऱ्या विकासाचे संग्रामपर्व या पुस्तकाचे प्रकाशन सहकार सभागृहात झाले. यावेळी अॅड. निकम बोलत होते. कार्यक्रमास अभिनेते मकरंद अनासपुरे, आमदार अरुण जगताप, माजी आमदार दादा कळमकर, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे, मनपातील विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, अविनाश घुले, शिल्पकार प्रमोद कांबळे, अंबादास पंधाडे, प्रा.माणिक विधाते, प्रकाश धोत्रे, सीए अशोक पितळे, किशोर मरकड आदी उपस्थित होते.

अनासपुरे म्हणाले, माणसाची खरी कारकीर्द तीस ते चाळीस वर्षांची असते. त्यामध्ये आपण काय करतो, समाजासाठी काय करतो हे महत्त्वाचे. लोकप्रतिनधी म्हणून आमदार जगताप असेच समाजपयोगी काम करीत आहेत. लोकांचे प्रेम मिळवत आहेत. त्यांच्या दिसण्यात आणि वागण्यातही देखणेपणा आहे. नगरला स्मार्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चित यशस्वी होईल. दोन वेळा महापौर, दोन वेळा आमदार होणे ही साधी गोष्ट नाही. जनतेचे प्रेम असल्याशिवाय ते शक्य नसते.

सत्काराला उत्तर देताना आमदार जगताप म्हणाले, नगर शहर हे वेगाने विस्तारत आहेत. गेल्या काही काळात होत असलेल्या विकासकामांतून नगरला स्मार्ट सिटी करण्याचा प्रयत्न आहे. खरे तर या पुस्तकाला विकासाचे संग्रामपर्व ऐवजी विकासाचे नगरपर्व असे नाव द्यायला हवे होते. कारण विकासकामे करताना नागरिकांची साथ महत्त्वाची असते. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कुलकर्णी, डॉ.देवदान कळकुंबे, प्रकाश धोत्रे आदींनी मनोगत व्यक्त केले.

विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत
चाळीस वर्षांनंतर नगरसाठी नवीन पाणी योजना कार्यान्वित होत आहे. शहर कचराकुंडी मुक्त झाले, सुमारे चाळीस हजार पथदिवे बसवले. कोरोनामुळे दोन वर्षे कामांचा वेग कमी झाला, परंतु आता जोमाने विकासकामे सुरु आहेत. विकासकामांवर काही जण टिका करतात. पण प्रत्येकाने विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपले शहर म्हणून योगदान दिले पाहिजे, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले.

बातम्या आणखी आहेत...