आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निरुपण:ज्ञान-विज्ञानाचा योग्य समन्वय साधला तरच जीवन सुखी होईल ; अरुणनाथगिरी महाराज यांचे प्रतिपादन

कोपरगाव शहर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्ञानाला विज्ञानाची जोड देताना माणसाने स्वतःची मनोवृत्ती सकारात्मक केली की, जगण्यातला आनंद वाढतो, केवळ ज्ञानाने किंवा केवळ आध्यात्माने माणूस ज्ञानी बनतो असे नाही. नवनवीन तंत्रज्ञानाच्या कक्षा मोठ्या प्रमाणावर विस्तारत असताना संपूर्ण जगच विज्ञानाने आपल्या कवेत घेतले आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाने ज्ञानाबरोबरच विज्ञानालाही सोबत घेऊन चालणे अनिवार्य झाले आहे, असे उद्गार श्रीक्षेत्र भामाठाण येथील अडबंगनाथ संस्थानचे मठाधिपती जगद्गुरु स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले. गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या अठराव्या पुण्यस्मरणानिमित्त संवत्सर येथे आयोजित कार्यक्रमात ‘संत विचार : ज्ञान - विज्ञान समन्वय’ या विषयावर ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी भानुदास महाराज रोहोम, डवाळा आश्रमाचे प्रमुख भरत महाराज, महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर, राज्याचे विभागीय शिक्षण उपसंचालक रमाकांत काठमोरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कृषी अधिकारी पंडित वाघिरे, गोदावरी दूध संघाचे संचालक राजेंद्र बापू जाधव, उपाध्यक्ष संजय खांडेकर, सरपंच सुलोचना ढेपले यांची प्रमुख उपस्थिती होती. गोदावरी खोरे दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शालिनी विखे पाटील यांनी आपल्या भाषणातून मुलींच्या शिक्षणाविषयीचे परजणे आण्णांच्या मनात असलेले स्वप्न आज प्रत्यक्षात साकार झालेले आहे. संवत्सर व कोपरगांव परिसरात शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने ग्रामीण भागातील मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षण घेण्यास प्रवृत्त झाल्या असल्याचे सांगून आण्णांच्या कार्यास त्यांनी उजाळा दिला. महानुभाव आश्रम परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालय व कोपरगाव येथील महिला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले. तसेच महिला महाविद्यालयाच्या कृपासिंधू नियतकालिकाचे प्रकाशनही करण्यात आले. याप्रसंगी नानासाहेब सिनगर, गोरखनाथ शिंदे, उत्तम माने, भाऊसाहेब कदम, सदाशिव कार्ले, निवृत्ती नवले, सयराम कोळसे, चंद्रकांत लोखंडे, खंडू फेपाळे, लक्ष्मण साबळे, लक्ष्मण परजणे, अनिल आचारी, सोमनाथ निरगुडे, अशोकराव काजळे, अॅड. गंगाधर कोताडे, रामभाऊ निकम, दादा दुपके, दिलीप ढेपले, साहेबराव सैद, माजी उप भियंता उत्तम पवार, कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, अॅड. बाळासाहेब कडू, योगेश जोबनपुत्रा, मंगेश पाटील, अनिल सोनवणे, प्रा. आंबादास वडांगळे आदी होते. उपसरपंच विवेक परजणे यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...