आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिला पाऊस:नगरमध्ये दुसऱ्या दिवशी हलक्या स्वरूपाचा पाऊस ; गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्मी नोंद

नगरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नगर शहर व परिसरात बुधवारी दुपारी हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, ही अत्यंत कमी आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत नोंद निम्मी आहे. दरम्यान शहरात सायंकाळी सहानंतर पावसाने अनेक भागात हजेरी लावली.

मंगळवारी अहमदनगर जिल्ह्यात गेल्या १० दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली होती. बुधवारी देखील अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या काही भागात पावसाने मध्यम तसेच जोरदार हजेरी लावली. नगर जिल्ह्यात गेल्या वर्षी १ जूनपासूनच मान्सूनचा पावसाला सुरुवात झाली होती. यंदा मात्र १ जून उलटल्यानंतर ७ जूनला जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह तुरळक व मध्यम स्वरूपाच्या पाऊस झाला होता. त्यानंतर ११ जूनला जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली होती. १ जून ते २० जून पर्यंत नगर जिल्ह्यात केवळ दोन दिवसच पाऊस झाला होता. उर्वरित नक्षत्र मात्र कोरडेच गेले होते. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा लागलेली होती. अहमदनगर शहरात हलक्या स्वरूपात तर जिल्ह्यातील पारनेर व अन्य तालुक्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. २४ तासांत जिल्ह्यात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.