आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यात्मक:वारकरी संप्रदायाप्रमाणेच पोलिसही करतात समाजामध्ये प्रबोधनाचे काम ; अध्यात्मक : जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे प्रतिपादन

श्रीगोंदे4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाज प्रबोधन आणि लोकांवर संस्कार करण्याचे काम वारकरी संप्रदाय करते तसेच काम पोलिस प्रशासन करत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले.

श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव फाटा येथे चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती व वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट सोसायटीच्या वतीने आयोजित तुलसी रामायण कथा व ज्ञानयज्ञ सोहळ्याचा शुभारंभ पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते, जिल्हा बँक संचालिका, जिल्हा परिषद सदस्य अनुराधा नागवडे, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, माजी पं. स. सभापती शहाजी हिरवे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पाटील म्हणाले, समाज सुधारावा, सोहळ्याचे निमंत्रक वृद्धेश्वर अर्बन मल्टिस्टेटचे चेअरमन विठ्ठलराव वाडगे यांनी बँकिंग क्षेत्रात चांगली कामगिरी करतानाच सामाजिक बांधिलकीतून समाज कार्य तसेच अध्यात्म क्षेत्रात चांगले कार्य केले. नागवडे म्हणाल्या, विठ्ठलराव वाडगे यांनी बँकिंग आणि सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य पार पाडली. अनेक दिग्गजांना न जमणारे धार्मिक कार्यक्रम वाडगे यांनी आयोजित केले. यावेळी कथा प्रवक्ते रामयणाचार्य रामराव महाराज ढोक यांनी आपल्या मधूर वाणीतून सेवेला सुरुवात केली. यावेळी विठ्ठलराव वाडगे, शुभम वाडगे, पुण्यातील आयुर्वेदाचार्य डॉ. शिल्पा थोरात, पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, शरद गावडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद गावडे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...