आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियान:लोकशाही बळकटीकरणासाठी आधार कार्डशी मतदान ओळखपत्र जोडणी करा

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

लोकशाही सक्षम करण्यासाठी मतदानातील प्रत्यक्ष सहभागी व्हावे. राजकारणातील गुन्हेगारीकरण या गोष्टी दुर करण्यासाठी लोकशाहीत मतदार नोंदणी करणे, मतदार यादी अद्यावत करणे, आता एक पाऊल पुढे जाऊन आधार कार्ड हे मतदान ओळखपत्राशी जोडणे हे महत्त्वाचे झाले आहे. युवकांनी याबाबत पुढाकार घेऊन जास्तीत जास्त मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करून घेणे गरजे आहे, असे प्रतिपादन प्राचार्य आर. जे. बार्नबस यांनी व्यक्त केले.अमहदनगर महाविद्यालयात आधार कार्डशी मतदान ओळखपत्र जोडणी अभियान राबविण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य बार्नबस बोलत होते. यावेळी मतदान ओळखपत्र आधार कार्डशी लिंक करताना कसे लिंक करावे, यासंबधीच्या विविध पायर्या आणि त्याबद्दलची माहिती उपस्थीत विद्यार्थी ,विद्यार्थिनी प्राध्यापक यांना विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.भागवत परकाळ यांनी दिली.

या कार्यक्रमचे आयोजन विद्यार्थी विकास मंडळ अहमदनगर महाविद्यालय अहमदनगर व तहसिल कार्यालय निवडणूक विभाग अहमदनगर यांनी केले. याप्रसंगी नायब तहसीलदार निवडणूक तहसील कार्यालय अहमदनगरचे महादेव गायकवाड, उपप्राचार्य प्रा.डॉ.प्रीतम कुमार बेदरकर, उपप्राचार्य सय्यद रज्जाक, प्रबंधक रजिस्टार दीपक अल्हाट, प्रा. डॉ .रिचा शर्मा, प्रा. डॉ संतोष देशमुख, प्रा. माधव जाधव, प्रा. डॉ. पराग कदम, प्रा . समिर मोहपात्रा, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी पवनजी छाबडा, प्रा.डॉ. सत्ताप्पा चव्हाण आदी उपस्थित होते. प्राचार्य बार्नबस म्हणाले, योग्य निर्णय प्रक्रियेद्वारे देशाला प्रगतीच्या वाटेवर पुढे नेता यावे यासाठी जनतेने निवडलेले प्रतिनिधी सक्षम असणे गरजेचे आहे आणि त्यासाठी मतदारांनी निर्भयपणे तसेच विचारपूर्वक मतदान करणे तेवढेच आवश्यक आहे.

बातम्या आणखी आहेत...