आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र दिनी (१ मे) शासनाकडून अधिकृत मद्य परवानाधारक विक्रेत्यांच्या मद्य दुकांनाना कोरडा दिवस (ड्राय डे) दिलेला असतानादेखील अकोले शहर व परिसरातून अवैधरीत्या दारुची विक्री करताना अकोले पोलीसांकडून पाच आरोपीस रंगेहाथ पकडण्यात आले. यासंदर्भात धनेश्वर काशिनाथ पवार (आंबेडकरनगर, अकोले), विलास शंकर पवार व सतरश विलास पवार (सुभाषरोड, अकोले), उषा शेटीबा पवार (शाहुनगर, अकोले) आणि माधुरी गायकवाड (कारखानारोड, अकोले) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून एकूण ५६ हजार ७६० रुपयांची देशी दारु जप्त करण्यात आली.
अकोले पोलीसांना आपल्या गुप्त खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकोले पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक मिथुन घुगे यांनी पोलीस पथके तयार करुन अकोले शहर व परिसरातील शाहुनगर, सुभाषरोड, अगस्ती कारखानारोड, आंबेडकरनगर आदी ठिकाणांहून अवैध दारुची साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर छापे टाकून देशी दारुचे २० बॉक्स मधून एकूण ५६ हजार ७६० रुपयांची देशीदारु मुद्देमालासह जप्त केली. या गुन्ह्यात धनेश्वर काशिनाथ पवार रा. आंबेडकरनगर, विलास शंकर पवार रा. सुभाषरोड, सतिश विलास पवार रा. सुभाषरोड, उषा शेटीबा पवार रा. शाहूनगर व माधुरी गायकवाड रा. कारखानारोड यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी ३ आरोपींना अटक करुन अकोले न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले. आरोपींना न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.