आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामृत्यू हे सत्य आहे, हे ध्यानात ठेवून जीवन जगताना देशासाठी, धर्मासाठी अन् कर्मासाठी जगा. जगायचंच असेल, तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगणं जगा, असे आवाहन सोपान महाराज कन्हेरकर यांनी केले आहे. छत्रपती तरुण मंडळाच्या वतीने सोपान महाराज कन्हेरकर यांच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे आयोजन जे.टी.एस. हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मनीष मुथा होते. प्रमुख अतिथी म्हणून राजेश खटोड होते. कन्हेरकर म्हणाले, “या देशात राहायचे असेल, तर ‘भारतमाता की जय’ म्हणावंच लागेल. ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल. या देशात जन्मलेला प्रत्येक जण हिंदूच आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या स्वप्नासारखे जगा, विश्व बंधुत्व ही भावना ठेवा.
आपण आपल्या माता-पित्याचे, या मातीचे, गावाचे, देशाचे देणं लागतो, याचे भान ठेवा.” माता-पित्यांची कमाई मौजमजा करण्यात उधळू नका. स्वतःचे तोंड गोरे करण्याच्या नादात, स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या नादात आई-वडिलांच्या तोंडाला काळं फासू नका. प्रेम करायचं, तर ते आई-वडीलावर, या देशावर करा. प्रेमाच्या नावाखाली सुरू असलेल्या ‘लव्ह जिहाद’ला बळी पडू नका. तरुणपणात अजाणतेपणाने केलेली एक चूक, तुमचंच काय, पण तुमच्या कुटुंबाचंही भविष्य बरबाद करू शकते, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम भराटे यांनी केले. सूत्रसंचालन अभिजीत राका यांनी, तर अध्यक्ष राहुल माळवदे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी अमोल खैरे, रोहित शिंदे, स्वप्नील खैरे, राम भोसले, विकी माळवदे, निखील पुजारी, किरण माळवदे, शुभम पारखे, अमोल म्हेत्रे, मनोज माळवदे, ओंकार साळूंके आदींनी विशेष प्रयत्न केले.
संस्कार व संस्कृती एकाच नाण्याच्या दोन बाजू
देवाने विनामूल्य दिलेल्या या देहाचा सदुपयोग करा. आत्मा व परमात्म्याचे मीलन म्हणजे राम आहे. शरीरात राम आहे, तोपर्यंत आपण आहोत. संस्कार व संस्कृती या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या दोन्ही बाजू सांभाळल्या पाहिजे, जपल्या पाहिजे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.