आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंद व्यक्त:शुक्रवारपासून घोडेगावात जनावरांचा बाजार सुरू

सोनईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या साडेतीन महिन्यापासून बंद असलेला घोडेगावचा जनावरांचा बाजार शुक्रवार दि. २३ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. गाई, म्हशी, शेळी, मेंढी यांचा बाजार नियमित सुरू होणार आहे. बाजार सुरू होणार असल्याने शेतकरी, पशुपालक, व्यापारी, दलाल व व्यावसायिकांनी आनंद व्यक्त करत बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्न करणारे नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांचे आभार मानले.

राज्यात व जिल्ह्यात तीन महिन्यांपूर्वी लंपी आजाराने थैमान घातले. या घातक आजाराने तालुक्यातही थैमान घातले. अनेक शेतकऱ्यांची जनावरे मरण पावली. आजाराचा वाढता प्रसार लक्षात घेत प्रशासनाने ९ सप्टेंबर २०२२ पासून घोडेगाव येथील जनावरांचा बाजार बंद ठेवला होता.

जिल्हा प्रशासनाने राबवलेल्या विविध उपाययोजना व प्रतिबंधात्मक उपचार, लसीकरणामुळे लंपी आजार आटोक्यात आला. शेतकरी व व्यापारी वर्गाची बाजार सुरू करण्याची मागणी होती. लवकर बाजार सुरू होईल, असा शब्द आमदार गडाख यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांना दिला होता.

बातम्या आणखी आहेत...