आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोहीम:भीमा नदीपात्रातील वाळू उपशावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; चार आरोपींना घेतले ताब्यात

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

खेड (ता. कर्जत) येथील भीमा नदी पात्रातील जलाशयात यांत्रिकी बोटीच्या सहाय्याने अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करणाऱ्यांविरूध्द स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करून चार जणांना ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना जिल्ह्यातील अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरूध्द कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. निरीक्षक कटके यांच्या मार्गदर्शनाखी दोन पथके स्थापन करण्यात आली आहेत.

सुकरदी मंजुर शेख (वय ३२), फारूख रोहिम शेख (वय ३२, दोघे रा. पहाडगाव, ता. उधवा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड ता. कर्जत), रफिकूल ऊर्फ इस्माल मुस्ताफा शेख (वय ३०) व रेजाऊल माजद शेख (वय २४, दोघे रा. बाघपिंजरा, ता. मोहनपुरा, जि. साहेबगंज, राज्य झारखंड, हल्ली रा. खेड, ता. कर्जत) यांना अटक केली आहे, तर यांत्रिकी बोटीचे मालक तेजस मोरे (रा. खेड, ता. कर्जत) व चाँद शेख (रा. वाटलुज, ता. दौंड) हे पसार झाले आहेत.तेजस मोरे व चाँद शेख हे परप्रांतीय मजुरांच्या सहाय्याने खेड शिवारातील भीमा नदीच्या पात्रात यांत्रिकी बोटीचे सहाय्याने अवैध वाळू उत्खनन व वाळू वाहनात भरुन वाहतूक करत असल्याची माहिती निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे अंमलदार सुनील चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, शंकर चौधरी, रोहित मिसाळ, विनोद मासाळकर, योगेश सातपुते व चंद्रकांत कुसळकर यांनी खेड येथे नदीपात्राजवळ जात स्पीडबोट सोबत घेऊन बोटीचा शोध घेतला.

अत्याधुनिक यांत्रीक बोटींचा वापर करून वाळूचा उपसा
खेड गावाच्या शिवारात भिमानदी पात्रात यांत्रिकी बोट व सेक्शन पंपाच्या सहाय्याने अवैध वाळू उपसा सुरू असल्याचे दिसताच पथकाने छापा टाकून बोटीवरील इसमांना ताब्यात घेतले. पोलिसांचे व महसूलचे वारंवार छापे पडूनही या परिसरात अवैध वाळू उपसा होत असल्याचे यामुळे समोर आले आहे. मात्र आता पोलिसांची याकडे बारकाईने नजर राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...