आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संसर्ग:नगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाऊन, जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट 5 टक्क्यांपेक्षा जास्त

नगर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात रोज ५०० ते ८०० कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. जिल्ह्याचा पॉझिटीव्हिटी रेट ५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे साेमवारपासून दहा दिवस (१३ ऑक्टोबरपर्यंत) दहापेक्षा अधिक कोरोनाबाधित रुग्ण असलेल्या गावांमध्ये संचारबंदीसह कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी रविवारी याबाबत लेखी आदेश पारित करून जिल्ह्यात ६१ गावांमध्ये कडक निर्बंध लागू केले आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी या गावांमध्ये सर्व व्यवहार पूर्ण बंद करण्याचा, नागरिकांची ये-जा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा दवाखाने, मेडिकल, टेस्टिंग सेंटर वगळता इतर सर्व आस्थापना दुकाने, वस्तू विक्री सेवा ४ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे या आदेशात म्हटलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...