आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंडन-एडींनबर्ग-लंडन सायकल स्पर्धा:इंग्लंडमधील सर्वात अवघड सायकल स्पर्धेसाठी नगरचे सायकलिस्ट शरद काळे रवाना

अहमदनगर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंग्लंडमधील सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या लंडन-एडींनबर्ग-लंडन या सायकल स्पर्धेत भाग घेण्यासाठी अहमदनगर सायकलिस्टचे ज्येष्ठ सदस्य शरद काळे पाटील हे रवाना झाले आहेत. दर चार वर्षांनी लंडन एडींनबर्ग लंडन ही 1539 किमीची अवघड स्पर्धा आयोजित केली जाते व त्यामध्ये जगातील कसलेले रायडर भाग घेत असतात. अहमदनगरमधून जाणारे ते एकमेव स्पर्धक आहेत.

काळे पाटील यांनी डेक्कन क्लिफ हँगर ह्या स्पर्धेत भाग घेतला होता. ही स्पर्धा वेळेत पूर्ण केल्या बद्दल पुढील वर्षी अमेरिकेत होणाऱ्या रेस अक्रॉस अमेरिका व पॅरिस ब्रेस्ट पॅरिस ह्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी काळे पाटील पात्र झाले आहेत.

इंग्लंड मध्ये होणारी ही सर्वात खडतर अशी ही सायकल स्पर्धा असून लंडन ते एडीनबर्ग व परत लंडन असे एकूण १५३० किमी अंतर सायकलस्वारांना 125 तासांत पार करावयाचे आहे. 7 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान ही स्पर्धा होत आहे. अनेक भारतीयांना विसा मिळण्यात अनंत अडचणी आल्या. त्यामुळे भारतातून आता फक्त 120 स्पर्धक या स्पर्धेत भाग घेत आहेत.

दर चार वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते. 2013 मध्ये भारतातून 8 सायकलिस्टनी भाग घेतला होता पैकी फक्त ऋतिक पटेल याने ही स्पर्धा पूर्ण केली तर 2017 मध्ये 53 सायकलिस्ट यांनी सहभाग घेतला. त्यापैकी फक्त 10 सायकलिस्ट यांनी ही स्पर्धा पूर्ण केली. यावरून ही स्पर्धा किती अवघड आहे याचा अंदाज येतो. 2021साली कोरोना मुळे स्पर्धा होऊ शकली नाही. ऑगस्ट 2022 मध्ये होणाऱ्या ह्या स्पर्धेत ह्या वर्षी भारतातून 120 सायकलिस्ट यात भाग घेत आहेत. अहमदनगर मधून भाग घेणारे ते पाहिले व एकमेव सायकलिस्ट आहेत. या रेस दरम्यान सायकल स्वारांना उन, वारा, पाऊस, थंडी व सर्वात महत्वाचे म्हणजे नेविगेशनची मोठी अडचण असते. त्यावर मात करून स्पर्धा वेळेत पूर्ण करावयाची असते.

मागील चार वर्षापूर्वी काळे पाटील यांनी सायकलिंगचा श्रीगणेशा केला व आज पर्यंत त्यांनी सात वेळा सुपर रांडोंनियर हा किताब पटकविला आहे. काळे पाटील यांनी सायकलिंग क्षेत्रात तसेच मोटारसायकलिंगमध्ये अनेक विक्रम करून अहमदनगरचे नाव देश पातळीवर पोहचवले आहे.