आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मोत्सव:संगमनेर शहरातील साळीवाडा येथील भगवान श्रीजिव्हेश्वर जन्मोत्सव उत्साहात साजरा

संगमनेर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील साळीवाडा येथील श्रीलक्ष्मीनारायण मंदिरात भगवान श्री जिव्हेश्वर जन्मोत्सव बुधवारी (१० ऑगस्ट) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रेयश गणेश वाडेकर याचे स्मरणार्थ गौरी व गणेश मच्छिंद्र वाडेकर यांनी महाप्रसाद वाटप केले. भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. वाडेकर मित्र परिवाराचे यावेळी सहकार्य लाभले.

कार्यक्रमात श्रीजिव्हेश्वर ग्रंथवाचन, सत्यनारायण महापूजा, पालखी पूजन, पालखी सभा, वाद्य मिरवणूक व दुपारी भगवान जिव्हेश्वर महाराज यांची आरती झाली. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...