आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएसटी कामगारांच्या प्रश्नावर चुकीच्या नेतृत्वाने केलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे व कामगारांचे मोठे नुकसान झाले. ते लवकर भरून निघणारे नाही, असा आरोप महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला. कर्मचाऱ्यांना राज्य शासनाएवढे पगार देण्यास महामंडळ कटिबद्ध आहे. सातवा वेतन आयोगाचा दावा अंतिम टप्प्यात असून, सेवाजेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणीसह सातवा वेतन आयोग लागू होण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू, असे शिंदे म्हणाले.
एस.टी. कामगार संघटनेच्या (मुंबई) जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन करताना शिंदे बोलत होते. शहरातील अक्षता हॉल येथे झालेल्या मेळाव्यात एस.टी. महामंडळात ३६ वर्षे सेवा करणारे (पाथर्डी आगार) व संघटनेचे प्रादेशिक सचिव ज्ञानदेव गणपत अकोलकर यांचा सेवापूर्तीनिमित्त त्यांचा सपत्निक मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून आमदार मोनिका राजळे, आमदार निलेश लंके, संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, विभागीय अध्यक्ष शिवाजी कडूस, कार्याध्यक्ष रोहिदास अडसूळ उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.