आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:आडते बाजार-दाळ मंडईत डीजेचा सर्वाधिक आवाज

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांनी गणेश मंडळांना मोकळीक दिल्याने १७ पैकी १२ ते १३ मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. मिरवणुकीत तब्बल तीन तास आडते बाजार-दाळ मंडईत डीजेच्या सर्वाधिक आवाजाची नोंद झाली. जवळपास सर्वच मंडळांनी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडली. या परिसरात शिवसेनेतील शिंदे गट व ठाकरे गटाच्या मिरवणुकीतील क्रमांकावरून निर्माण झालेल्या वादामुळे तब्बल तीन तास आडते बाजार ते तेलीखुंट या मार्गावरच मिरवणूक रखडली होती. पाच प्रमुख मंडळाचे डीजे या मार्गावर होते. त्यामुळे या मार्गावरच सर्वाधिक आवाजाची नोंद झाली.

कोतवाली पोलिस ठाण्यातील ध्वनी प्रदूषण पातळी मोजणाऱ्या पथकाने केलेल्या तपासणीत सर्वच मंडळांच्या डेसिबलची मर्यादा १०० ते ११० पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. बहुतांशी प्रमुख मंडळे नवीपेठेच्या पुढे सरकलीच नाहीत. त्यामुळे नवीपेठ ते चितळे रोड मार्गावर आवाजाची मर्यादाही तुलनेने कमी होती. दरम्यान, मिरवणुकीतील ध्वनी प्रदूषणासंदर्भात पोलिसांच्या पथकाने आवाजांची नोंद केलेली आहे. सोमवारी याबाबतचा अहवाल पोलिस अधीक्षकांकडे सादर होऊन त्यानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी सांगितले. मिरवणूक संपल्यानंतर कोतवाली व तोफखाना पोलिसांनी डीजे चालकांचे मिक्सर ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...