आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायलिसिस:बूथ हॉस्पिटलमध्ये अल्प दरात डायलिसिस सेवा ही मोठी उपलब्धी

नगर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१२५ वर्षांची यशस्वी आरोग्य सेवेची परंपरा असलेल्या दी साल्वेशन आर्मी संचालित बूथ हॉस्पिटलमध्ये न्यू लाईफ लाईन डायलिसिस फाउंडेशनच्या सौजन्याने सर्वसामान्य व गोरगरीब रुग्णांसाठी अल्पदरात डायलेसिस सेवा सुरू झाली. ही मोठी उपलब्धी आहे, असे प्रतिपादन शांतिकुमार मेमोरियल फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले.

दि साल्वेशन आर्मी संचालित बूथ हॉस्पिटल अहमदनगर आणि न्यू लाईफ लाईन डायलिसिस फाउंडेशन यांच्या सौजन्याने शनिवारी, १८ जून रोजी सायंकाळी इव्हॅन्जलिन बूथ हॉस्पिटल डायलिसिस सेंटरचे उद्घाटन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर डॉ. देवदान कळकुंबे, किडनी विकार तज्ञ जयेश वाघुलदे, डॉ. अजय साबळे, डॉ. प्रदीप जयस्वाल, रेव्हरंड डॉ. अनुप हिवाळे व न्यू लाईफ लाईन फाउंडेशनचे भुषण देसले आदी यावेळी उपस्थित होते.

फिरोदिया म्हणाले, जेव्हा आपण कुठलीही गोष्ट सकारात्मकतेने करतो, तेव्हा ती नक्कीच यशस्वी होते. बूथ हॉस्पिटलने २०२० व २०२१ या कोरोनाच्या काळात ७ हजारांहून अधिक रुग्णांवर मोफत उपचार करून कोरोना रुग्णांची सेवा केली. ही नगर जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रातील इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिली जाणारी कामगिरी आहे. त्याबद्दल बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांचे मी कौतूक करतो. बूथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांनी मनोगत व्यक्त केले. मेजर ज्योती कळकुंबे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तुषार गाडेकर, मेजर सुनील साळवे, मेजर जयमाला साळवे, प्रेरणा वंजारे, सूरज वंजारे, प्रवीण साबळे, कुणाल कळकुंबे, सुनील वाघमारे, सुशील वाघमारे, विकी पगारे, अमित पठारे, विजय कसबे यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...