आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लंपी रोगाची बाधा:श्रीरामपूर तालुक्यात लम्पी आटोक्यात; 962 बाधित

श्रीरामपूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपुर तालुक्यात पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नांमुळे लम्पी आटोक्यात आला आहे. ९६२ जनावरांना आतापर्यंत लंपी रोगाची बाधा झाली असून पशुसंवर्धन विभागाने युद्धपातळीवर या रोगाचा सामना करीत लसीकरण व उपचार करून ६७९ जनावरे बरी केली असली तरी ५३ जनावरांचा मृत्यू झाला आहे. तालुक्यातील तेरा गावांमध्ये लंपी रोगाची बाधा झालेली आहे.

ज्या भागात असे जनावरे आढळले आहेत त्या भागाच्या पाच किलोमीटर परिसरात पशुसंवर्धन विभागाने लसीकरण पूर्ण केलेले आहे. तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे ४ हजार १३२,टाकळीभान-५ हजार २९०,एकलहरे ४ हजार ५७०,खानापूर-३ हजार,उंबरगाव ४ हजार ४००,दिघी-३ हजार ५७३,भैरवनाथनगर-७ हजार ८३४,वांगी खुर्द ६ हजार ५००,भेर्डापूर ३ हजार ९००,वडाळा महादेव ५ हजार,नायगाव ७ हजार २५४,मातापूर ५ हजार २००,कमालपूर १ हजार ९०० असे एकूण ६२ हजार ६५३ लसीकरण पूर्ण झाले आहे. तर बेलापूर खुर्द येथे ५३ जनावरे बाधित तर ५ मृत,टाकळीभान-९१ बाधित तर ८ मृत,एकलहरे १९ बाधित व २ मृत,खानापूर ७६ बाधित तर ८ मृत,उंबरगाव १३ बाधित व ६ मृत,दिघी ९ बाधित,भैरवनाथनगर ५८ बाधित व २ मृत,वांगी खुर्द ९० बाधित व ३ मृत,भेर्डापूर १२८ बाधित व ६ मृत, वडाळा ३१ बाधित,नायगाव ३० बाधित ५ मृत,मातापूर ४० बाधित ३ मृत,कमालपूर ५० बाधित ५ मृत पावले आहेत.तालुक्यात २२९ जनावरांवर उपचार सुरू आहेत.

ऊस वाहतुकीसाठी आलेल्या बैलांचे लसीकरण पूर्ण
सध्या ऊसाचा गाळप हंगाम सुरु झालेला आहे.तालुक्यातील अनेक गावांमध्ये विविध ठिकाणाहून ऊस वाहतुकीसाठी बैल आलेले आहेत. शिवाय ऊस तोड कामगार इतरही जनावरे आपल्या सोबत आणतात त्या सर्वांचे लसीकरणही पूर्ण करण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय धीमते यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...