आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन करण्याच्या सूचना:लंपी; जनावरांचा बाजार बंद ठेवण्याच्या सूचना

शिर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात जनावरांमध्ये लम्पीचा शिरकाव सुरु झाल्याने पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी तातडीने पशुसंवर्धन विभागाच्या वतीने लसीकरण आणि फवारणीचे नियोजन करण्याच्या सूचना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना दिल्यानंतर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. लंपीचा धोका टाळण्यासाठी जनावरांचा आठवडे बाजार काही दिवस बंद ठेवण्याच्या सूचनाही यापूर्वीच बाजार समित्यांना देण्यात आल्या आहेत.

अकोले, श्रीरामपूर संगमनेर तालुक्यात स्किनचा शिरकाव झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हातील सर्वच गावामध्ये पशुसंवर्धन विभागा मार्फत लसीकरणांबरोबरच पशुपालकांमध्ये या आजारा बाबत जागृती केली जात असून या विभागा अंतर्गत लसीकरण मोहीम गावोगावी सुरू झाली. असून प्रत्येक गावात मोफत लस देण्याबरोबरचं शेतकऱ्यांना याबाबत जागृत केले जात आहे. या साथीच्या आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे जनावरांच्या शरीरावर कडक आणि गोल आकाराच्या गाठी येतात. हा आजार शेळ्या आणि मेढ्यांना होत नाही. देशीवंशापेक्षा संकरित जनावरांना लागण होण्याची शक्यता जास्त असते. शेतकऱ्यांनी गोचिड माशांचे नियंत्रण करण्याबरोबरचं गोठा स्वच्छ ठेवण्याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून मार्गदर्शन तसेच आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...