आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनात कधीच शंका नव्हती:सरकार कायदेशीर असल्याचे सिद्ध‎, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष‎ माधव भंडारी यांचा दावा‎

नगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर‎ सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या‎ निकालामुळे राज्य सरकारला दिलासा‎ मिळाला आहे. मात्र, याबाबत‎ आमच्या मनात कधीच शंका नव्हती,‎ पण आता राज्यातील सरकार‎ कायदेशीर मार्गाने स्थापन झाल्याचे‎ सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने‎ सिद्ध झाले आहे, असा दावा भाजपचे‎ प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी‎ गुरुवारी केला.‎

नगर शहर, उत्तर नगर व दक्षिण‎ नगर या तीन जिल्हाध्यक्ष पदांसाठी‎ इच्छुकांबरोबरच पदाधिकाऱ्यांची‎ भंडारी यांनी मते जाणून घेतली.‎ त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.‎

काय म्हणाले माधव भंडारी?

भंडारी म्हणाले, राज्यातील‎ सरकार घटनेतील सर्व तरतुदींचे,‎ कायद्याचे व संकेतांचे पालन करून‎ लोकशाही मार्गाने स्थापन झाले होते व‎ त्यामुळे तशी भूमिका ही आम्ही‎ आधीपासूनच मांडत आलो आहोत.‎ आमच्या या भूमिकेवर सर्वोच्च‎ न्यायालयाच्या निकालाने‎ शिक्कामोर्तब केले आहे, असा दावा‎ भंडारी यांनी केला.‎

अभ्यास करून भाष्य करेन

ते म्हणाले,काही तरतुदी व निरीक्षणे‎ व्यक्त करून ती मोठ्या पिठाकडे‎ पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च‎ न्यायालयाने दिला आहे, त्यावर आता‎ सुनावणी होईल. लोकशाही प्रक्रियेने‎ तिथे भूमिका मांडल्या जातील व त्यात‎ होणाऱ्या निर्णयाचे आम्ही स्वागत‎ करू. सर्वोच्च न्यायालयाची निरीक्षणे‎ व निकाल पत्र वेगळे आहेत.

त्यामुळे‎ राज्यपालांची भूमिका व गोगावले‎ यांची भूमिका याबाबत सर्वोच्च‎ न्यायालयाच्या निकाल पत्राचा पूर्ण‎ अभ्यास केल्यानंतर न्यायालयाची‎ निरीक्षणे व निकाल पत्रात नेमके काय‎ म्हटले आहे, हे समजून घेतल्यानंतर व‎ त्यांचा अभ्यास केल्यावर त्याबाबत‎ अधिक भाष्य करणे योग्य राहील.‎ \

‎ चांगली साथ दिली

गंधे‎ शहर भाजपच्या कार्यालयात‎ झालेल्या बैठकीत भैय्या गंधे‎ म्हणाले, गेले साडे तीन वर्षे मी‎ पक्षाचा शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी‎ मी पार पडली आहे. मला सर्वांनी‎ चांगली साथ दिल्याने मी काम करू‎ शकलो, याबद्दल सर्वांचे आभार‎ मानतो.‎