आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराश्रीक्षेत्र मढी येथे चैतन्य कानिफनाथांचा यात्रोत्सव होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालतो. कैकाडी समाजाची मानाची काठी वाजत-गाजत, नाथांचा जयजयकार करीत मंदिराच्या कळसाला भेटवून सोमवारी सकाळी मढी यात्रेला प्रारंभ झाला. या वेळी कैकाडी समाजाचे मानकरी नारायण बाबा जाधव व नाथभक्त उपस्थित होते. सुमारे साडेसातशे वर्षांपूर्वीची मानाची परंपरा जपत राज्यातील कैकाडी समाज बांधवानी मढी येथे वाजत-गाजत येऊन कानिफनाथांच्या समाधी मंदिराच्या कळसाला मानाची काठी टेकविली. मानाची पहिली काठी कळसाला टेकवून १५ दिवस चालणाऱ्या यात्रेला प्रारंभ झाला. होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत तीन टप्प्यांमध्ये मढीची यात्रा चालते. पहिला टप्पा होळी, रंगपंचमीचा दुसरा, तर अमावस्येला तिसरा टप्पा संपन्न होतो. अभय आव्हाड, गोकुळ दौंड, बबन मरकड, सरपंच संजय मरकड, भाऊसाहेब मरकड, शिवजीत डोके, अर्जुन शिरसाठ, रवींद्र आरोळे, नवनाथ मरकड, भगवान मरकड आदी उपस्थित होते.
पाथर्डीतून मिरवणुकीला प्रारंभपाथर्डी शहरातून रविवारी (ता. ५) रात्री वाजत-गाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपरिक ताल व नाथ सांप्रदयाची विविध वैशिष्ट्ये असलेली मिरवणूक रात्रभर मिरवत सकाळी मढीत आली. ग्रामप्रदक्षिणा करीत धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी दहा वाजण्याचा सुमारास मानाची काठी कळसाला लागली. त्यानंतर अमावस्येपर्यंत १५ दिवस विविध गावांचे भाविक येऊन मंदिराच्या छोट्या कळसाला काठ्या लावून मढीची वारी पूर्ण करतात. मानाची काठी मंदिराच्या कळसाला भेटून मढी यात्रेला सुरुवात झाली.
पाथर्डीतून मिरवणुकीला प्रारंभपाथर्डी शहरातून रविवारी (ता. ५) रात्री वाजत-गाजत मानाच्या काठीची मिरवणूक निघाली. डफांचा पारंपरिक ताल व नाथ सांप्रदयाची विविध वैशिष्ट्ये असलेली मिरवणूक रात्रभर मिरवत सकाळी मढीत आली. ग्रामप्रदक्षिणा करीत धार्मिक विधी झाल्यानंतर सकाळी दहा वाजण्याचा सुमारास मानाची काठी कळसाला लागली. त्यानंतर अमावस्येपर्यंत १५ दिवस विविध गावांचे भाविक येऊन मंदिराच्या छोट्या कळसाला काठ्या लावून मढीची वारी पूर्ण करतात.मानाची काठी मंदिराच्या कळसाला भेटून मढी यात्रेला सुरुवात झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.