आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदेश:शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत न करण्याचे महावितरणचे आदेश

कौठा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नैसर्गिक संकटामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी नेवाशाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच मंत्रालयात भेट घेऊन शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडला जाऊ नये म्हणून साकडे घातले होते. त्यामुळे त्याच्या प्रयत्नाला यश मिळाले असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांकडून मुरकुटे यांचे आभार व्यक्त केले जात आहे.

नेवासा तालुक्यातील शेतकरी नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत आला आहे. अतिवृष्टी ढगफुटी, वादळ, रोगराई यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम २०२१- २२ पुर्णपणे वाया गेला होता. हातातोंडाशी आलेला घास नैसर्गिक संकटामुळे हिरावला गेला असताना महावितरणकडून शेतकऱ्यांच्या कृषी पपांचा वीज पुरवठा तोडला जात होता. शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले होते. अशा परिस्थितीत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेत वीज पुरवठा न तोडण्याची मागणी केली होती.

त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडीत करु नये, असे आदेश महावितरणकडून देण्यात आल्याने शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. मुरकुटे यांच्या प्रयत्नाला यश मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तर लाखो शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. या निर्णयाबद्दल माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस याचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...