आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरकियांच्या आक्रमणाविरुद्ध सर्वात प्रथम महाराणा प्रताप यांनी कडवी झुंज दिली आणि आपला राजपुत बाणा दाखवून दिला. ज्यांचे चारित्र्य चांगले असते त्यांचेच चरित्र सांगितले जाते. महाराणा प्रताप हे चारित्र्यसंपन्न पराक्रमी योद्धा होते. त्यामुळेच त्यांनी इतिहासावर आपला ठसा उमटवला, असे प्रतिपादन प्रा. सोपानराव वाटपाडे यांनी केले.
बेलापूर येथील शिवराणा मंडळाच्या वतीने महाराणा प्रताप जयंती सोहळ्यात प्रा. वाटपाडे बोलत होते. अध्यक्षस्थानी बेलापूर पत्रकार संघाचे अध्यक्ष भास्कर खंडागळे होते. यावेळी ज्येष्ठ नेते सुनील मुथा, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, पंचायत समिती सदस्य अरुण पा. नाईक, उपसरपंच अभिषेक खंडागळे, चेअरमन सुधीर नवले, सुवालाल लुक्कड, रणजित श्रीगोड, इस्माईल शेख, सुधाकर खंडागळे, साहेबराव वाबळे, प्रफुल्ल डावरे, तिळवण तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष लहानुशेठ नागले, राहुल माळवदे, महेश कुऱ्हे, प्रभात कुऱ्हे, विष्णूपंत डावरे, दिलीप दायमा, भय्या शेख आदी उपस्थित होते.
महाराणा प्रतापांनी मोगल साम्राज्याविरुद्ध झुंज दिली. सम्राट अकबराच्या लाखभर सैन्याविरुद्ध केवळ दहा हजार अठरापगड जातीच्या योद्ध्यांना हाताशी धरून त्यांनी हल्दीघाटात लढत दिली. ही लढाई जगातल्या मोजक्या लढाईपैकी एक मानली जाते. अध्यक्षीय भाषणात भास्कर खंडागळे म्हणाले, महाराणा प्रताप हे धर्मरक्षक होते. आदिवासी, घिसाडी, लोहार अशा समाजातील युवकांना हाताशी धरून त्यांचे हाती शस्त्र देऊन त्यांना लढायचे बळ दिले. मोगल साम्राज्याच्या साम्राज्यवादाला अटकाव केला. महाराणा प्रताप यांच्या पराक्रमाची आणि शौर्याची इतिहासकारांनी फारशी दखल घेतली नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते सुनील मुथा यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, अत्यंत कष्टाचे जीवन जगणाऱ्या घिसाडी समाजाच्या युवकांनी राणा प्रताप जयंती साजरी करून आदर्श घडवला आहे. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवराणा मंडळाचे अध्यक्ष किरण साळुंके, उपाध्यक्ष विजय साळुंके, बाजीराव पवार, विलास पवार, भगवान पवार, सागर पवार, जालिंदर पवार, आकाश साळुंके, दिनेश साळुंके, रोहित पवार, अक्षय पवार, सचिन पवार, सोमनाथ शिंदे, योगेश माळी आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.