आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, ती जागी झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाहीत, मी एकटा काय करु? ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा सवाल

अहमदनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अण्णा हजारे यांनी देश बचाव जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला.

देशातील राजकारणात काही वाद किंवा चर्चा सुरू झाल्यावर सर्वांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची आठवण येत असते. अशा वेळी आता अण्णा हजारे कुठे गेले असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो. तसेच आता अण्णा हजारे हे झोपले आहेत का? अशी विचारणाही केली जाते. आता समाजसेवक अण्णा हजारेंनीच जनतेला हा सवाल केला आहे. 'जनता हीच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे. जनता जागी झाल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाहीत' असे अण्णा हजारे म्हणाले आहेत.

गेल्या काही काळापासून अण्णा हजारे हे शांत आहेत. दरम्यान देश बचाव जन आंदोलन या समितीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून अण्णा हजारे यांनी देशातील विषयांवर अण्णा हजारांनी भूमिका मांडावी अशी मागणी केली होती. त्यांनी भूमिका मांडली नाही तर आंदोलन करु असा इशारा देखील त्यांनी दिला होता. यानंतर अण्णा हजारे यांनी या समितीला चर्चेसाठी बोलावले होते. त्यांच्या भेटीदरम्यान अण्णा हजारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यावेळी अण्णा हजारे यांनी देश बचाव जनआंदोलन समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. ते म्हणाले की, 'आता माझे वय हे 84 वर्षे झाले आहे. देश बचाव जनआंदोलन समिती या तरुणांनी स्थापन केली आहे, यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो. तुम्ही लढा उभारला तर मी त्यामध्ये नक्कीच सहभागी होईल असे आश्वासन देखील अण्णा हजारेंनी दिले. पुढे ते म्हणाले की, आपण यापूर्वी आंदोलने करुन लोकहिताचे अनेक कायदे मंजूर करुन घेतले आहेत. मात्र आता सरकार बहुमताच्या जोरावर कोणतेही कायदे मंजूर करुन घेत आहे. मागणी नसताना हे कायदे मंजूर केले जात आहेत. जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे. यामुळे सरकार काहीही करु शकत आहे. जनतेने आवाज उठवून सरकार बदलण्याची ताकद उभी केली तरच सरकार झुकेल आणि जाचक कायदे रद्द केले जातील' असे अण्णा हजारे म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...