आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संयुक्त पूर्व परीक्षा - २०२२:18 उपकेंद्रावर शनिवारी महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा; निवासी उपजिल्हाधिकारी पाटील यांची माहिती

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा - २०२२ शनिवार ५ नोव्हेंबरला नगर जिल्ह्यातील १८ उपकेंद्रावर सकाळी ११ ते दुपारी १२ यावेळेत घेण्यात येणार आहे, अशी माहिती परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी बुधवारी दिली आहे. या परिक्षेसाठी नगर शहरातील १८ उपकेंद्रावर एकूण ६ हजार ६५२ उमेदवार परिक्षेस बसलेले आहेत.

या परीक्षेसाठी उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी- ५ , भरारी पथक प्रमुख- १, वर्ग १ संवर्गातील उपकेंद्र प्रमुख - १८ अधिकारी, तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस असे विविध वर्ग ६ संवर्गातील एकूण ६२५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी ९.३० वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. उमेदवारांनी काळया शाईचे बॉलपॉइंट पेन वापरणे आवश्यक असून उमेदवारांना एकमेकांचे पेन लिखाण साहित्य वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.

मोबाईल पेजर डिजिटल डायरी, मायक्रोफोन, स्मार्टवॉच यांसारखी दूरसंचार साधने व कॅल्क्युलेटर परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये आणि परीक्षा दालनात आणण्यास व स्वतःजवळ बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारास या परिक्षेसाठी व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पुढील सर्व परीक्षांसाठी कायमस्वरूपी प्रतिरोधित करण्यात येणार आहे.

परीक्षा उपकेंद्र व परिसरात १४४ कलम केले लागू
कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परीक्षा उपकेंद्राच्या १०० मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने बंद ठेवणेकामी परिक्षेच्या दिवशी परिक्षाक्षेत्रामध्ये सकाळी ७ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रीया संहिता कलम १४४ (३) लागू करण्यात आलेले आहे.

बातम्या आणखी आहेत...