आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमध्ये 35 वी राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धा:महाराष्ट्राचा संघ रवाना, संघात नगरच्या चार जणांचा समावेश

अहमदनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

फगवाडा, जालंदर (पंजाब) येथे होणाऱ्या 35 व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा बेसबॉल संघ बुधवारी झेलम एक्सप्रेसने रवाना झाला.

राज्याच्या या संघात अक्षय आव्हाड, शमित माळी, कन्हैया गंगुले-तिघे कोपरगाव, मुस्तकिम पिरजादे-अहमदनगर, नंदन परब, प्रदीप पाटील-दोघे मुंबई, सीताराम भांड सोलापूर, तुषार ललवानी-मुंबई उपनगर, अक्षय मोगल -नाशिक, आकाश वण्णे - पुणे, संतोष कचरे - पुणे, ऋषिकेश राऊळ - मुंबई, किशोर काळे - बीड, आकाश साबणे - परभणी, रविराज साळवे - जळगाव, विनित सकपाळ - मुंबई, रोहित चव्हाण - औरंगाबाद, अक्षय हावळे - सोलापूर यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनच्या मान्यतेने अहमदनगर जिल्हा असोसिएशनच्या वतीने कोपरगावच्या श्री सद्गुरु गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या मैदानावर महाराष्ट्राच्या पुरुष संघांचे राष्ट्रीय स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर या कालावधीत हे प्रशिक्षण शिबिर काॅलेजच्या मैदानावर झाले. या शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य सानप यांच्या हस्ते झाले. राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र कोहकडे, एस. एस. जी. एम. काॅलेजचे ऑफीस सुपरीडेंट सुनील गोसावी हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा समारोप बुधवारी झाला.

बेसबॉल असोसिएशनचे अध्यक्ष अरुण चंद्रे म्हणाले, महाविद्यालयाला खेळाची खूप थोर परंपरा आहे. ती जोपासण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. बेसबाॅल असोसिएशनचे सचिव मकरंद कोऱ्हाळकर यांनी या बेसबॉल संघात कोपरगावचे तीन खेळाडू असल्याची माहिती देऊन हा संघ राष्ट्रीय स्पर्धेत अजिंक्यपद प्राप्त करील, अशी अपेक्षा व्यक्त केली. राष्ट्रीय व्हॉलीबॉल प्रशिक्षक राजेंद्र पाटणकर, मळेगाव थडीचे प्रगतशील शेतकरी खोंड, के. जे. सोमय्या कॉलेजचे वरिष्ठ क्रीडा संचालक प्रा. सुनील कुटे, कनिष्ठ महाविद्यालयाचे मिलिंद कांबळे, एस. एस. जी. एम.चे क्रीडा संचालक साठे, संघाचे प्रशिक्षक राजेंद्र बनसोडे, नांदेडचे राष्ट्रीय पंच आनंदा कांबळे आदी उपस्थित होते. या संघाला महाराष्ट्र बेसबॉल असोसिएशनचे सचिव राजेंद्र इखणकर, अहमदनगर जिल्हा बेसबॉल संघटनेचे अध्यक्ष अरुण चंद्रे, सचिव मकरंद कोऱ्हाळकर, सदस्य अंबादास वडांगळे, राजेंद्र पाटणकर, प्राचार्य सानप आदींनी शुभेच्छा दिल्या.

बातम्या आणखी आहेत...