आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विजय:पदकतालिकेत महाराष्ट्राचा संघ अव्वल; 5 सुवर्ण पदकांची कमाई, खेलो इंडिया स्पर्धेत पहिल्या दिवशी ध्रुव ग्लोबल स्कूलचे वर्चस्व

संगमनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

हरयाणातील पंचकुला येथे सुरु असलेल्या चौथ्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांची लयलुट करीत पदतालिकेत पहिले स्थान पटकावले. स्पर्धेत योगासनांचा समावेश करण्यात आल्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगानपटूंनी पहिल्याच दिवशी पाच सुवर्णपदकांसह एका रौप्य पदकाची कमाई केली. संघाने नऊ सुवर्ण पदक, चार रौप्य व कांस्य पदकांसह अव्वल स्थान पटकावले.

योगासनांना खेळांचा दर्जा प्राप्त झाल्याने प्रथमच त्याचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला. स्पर्धेत महाराष्ट्र संघातील २२ स्पर्धाकांपैकी ध्रुव स्कूलच्या २० योगासनपटूंचा समावेश आहे. योगासनात सुमीत बंडाळे याने सुवर्णपदक प्राप्त करीत संघाचे खाते उघडले. मुलींच्या गटात ध्रुवच्या तन्वी रेडीज हिने रौप्य पदक मिळविले. मुलांच्या अर्टिस्टिक दुहेरी प्रकारात आर्यन खरात, निबोध पाटील तर मुलींच्या गटात वैदही मयेकर, युगांका राजम या जोडीने सुवर्ण पदकाची कमाई केली.

रिदमीक योगासनमध्ये नानक अभंग, अंश मयेकर, स्वरा गुजर, गीता शिंदे यांनी सुवर्ण पदक पटकावले. योगासन स्पर्धेच्या पहिल्या सत्रात ध्रुवच्या खेळाडूंनी राज्याला पाच सुवर्ण, एक रौप्य पदक मिळून देत महाराष्ट्राला सुवर्णतालिकेत अव्वलस्थानी नेवून ठेवले. योगासनात ध्रुव स्कूलच्या स्पर्धकांनी खेलो इंडिया युवा स्पर्धेत केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल ध्रुवचे अध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, उपाध्यक्ष गिरीश मालपाणी, प्राचार्या अर्चना घोरपडे व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...