आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

अनलॉक:नोव्हेंबरअखेर महाराष्ट्र अनलॉक, कोरोना तपासणी 800 रुपयांत होणार : आरोग्यमंत्री राजेश टोपे

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होतील

सर्वांनी सावधानता बाळगली तर नोव्हेंबरअखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. आरोग्यमंत्री टोपे हे शुक्रवारी रात्री जालना येथे जात असताना नगरमध्ये काही वेळ थांबले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, राज्यातील सर्व व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरळीत होत आहेत. शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा लवकरच टप्प्याटप्प्याने सुरू होतील. आपण सर्वांनी सावधानता बाळगली, तर नोव्हेंबरमध्ये संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल अशी अपेक्षा करूया. टोपे म्हणाले, कोरोना तपासणीचे दर खाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आठवडाभरात दर आठशे रुपये होतील.

टीआरपी घोटाळा, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश यावरही टोपे यांनी भाष्य केले. राष्ट्रवादीत योग्य लोकांचे नेहमीच स्वागत केले जाते, असे म्हणत टोपे यांनी खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत अधिक बोलणे टाळले. काही चॅनल्सनी टीआरपी घोटाळा करत धूळफेक केली. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे ते म्हणाले.