आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर:विरोधीपक्षनेत्यांनी रस्ता केला म्हणून मुख्यमंत्री कोकणात पोहोचले, रत्नागिरीचे पालकमंत्री पळपुटे; चित्रा वाघ यांची टिका

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अहमदनगर येथे पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी वाघ अहमदनगर दाैऱ्यावर आल्या होत्या.

मुख्यमंत्री पूरग्रस्त भागाकडे पोहोचले त्यांचे तर अभिनंदन करायला हवे, पण खरे अभिनंदन प्रवीण दरेकरांचेही करायला हवे, कारण विरोधीपक्षनेते तेथे पोहोचल्याची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. रत्नागिरी अख्खे पाण्याने वेढलेले असताना पालकमंत्री अनिल परब तेथून पळून मुंबईत आले, ते पळपुटे पालकमंत्री आहेत, अशी टिका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केली.

अहमदनगर येथे पोलिस अधीक्षकांची भेट घेण्यासाठी वाघ अहमदनगर दाैऱ्यावर आल्या होत्या. त्यानंतर त्या भाजप कार्यालयात पत्रकारांशी बोलत होत्या. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, वाघ म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांचे मातोश्री ते पंढरपूर ड्रायव्हिगचे काैशल्य पाहिले आहे. आता त्यांनी हे काैशल्या कोकणात दाखवायला हवे. मोठी नैसर्गीक आपत्ती असताना सरकारी यंत्रणा तेथे वेळेत पोहोचली नाही. पण विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तेथे पोहोचले. केंद्राची जबाबदारी केंद्र पार पाडेलच, पण म्हणून तुमचीही जबाबदारी आहे. आता मुख्यमंत्री पोहोचले त्यांचे अभिनंदन करायला हवे. मुख्यमंत्री मंत्रालयात आले ही बातमी होऊ शकते, यापेक्षा वेगळे काय असू शकते. पण अभिनंदन प्रवीण दरेकरांचेच करायला हवे, त्यांनी रस्ता तर केला. विरोधी पक्षनेते पोहोचल्याची दखल किमान मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली. भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, गिरीश महाजन, निरंजन डावखरे यांचे त्रिवार अभिनंदन. जेथे यंत्रणा पोहोचली नाही, तेथे हे पोहोचले.

रत्नागिरी अख्खे पाण्याखाली गेले असताना त्या जिल्ह्याचे पालकमंत्री परब पळून मुंबईत आले, हे कसले पालकमंत्री, हे तर पळपुटे मंत्री आहेत. पालकमंत्री म्हणून नियोजन करण्याचे त्यांचे काम होते. लोक मरत असताना, घरे पाण्याखाली जात असताना मुंबईला पळून आले. माझं कुटुंब माझी जबाबदारी म्हणत, त्यांनी स्वतःच्याच कुटुंबाची जबाबदारी त्यांनी घ्यायची ठरवली का ? मी २२ वर्षे या क्षेत्रात काम करते. मुख्यमंत्री मंत्रालयात पोहोचल्याची ब्रेकिंग मी कधीच पाहिली नव्हती, पण आता ती बातमी होते, अशीही टिका त्यांनी केली.

सुरक्षा काढण्याची सुरूवात मुख्यमंत्र्यांपासून करा
सर्वज्ञानी म्हणवून घेणारे पंतप्रधान, अमित शहांची सुरक्षा काढा असे म्हणतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांची सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. खरच संजय राऊतांना जर असे म्हणायचे असेल, त्यांच्या सुरक्षा काढाव्यात, तर सुरूवात घरापासून करायला हवी. कारण मुख्यमंत्री एकतर वर्षावर असतात, किंवा मातोश्रीवर असतात. म्हणून त्यांच्या सुरक्षेचा काही प्रश्न नाही, असा टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...