आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी वाऱ्यासह अवकाळी गारपीट, पाऊस:पिकाचे प्रचंड नुकसान, अहमदनगर जिल्ह्यात पुढचे तीन दिवस जोरदार बरसणार

अहमदनगर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी (16 मार्च) ला रात्री विजेच्या कडकट्यांसह वादळी वाऱ्याचा पाऊस झाला. रात्री साडेसात वाजेच्या सुमारास वादळी वारा सुरू होताच अनेक भागात वीज पुरवठा खंडित झाला होता.

अहमदनगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. श्रीगोंदे तालुक्यातही अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.

गेल्या आठ दिवसांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे 4 हजार एकर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे अद्याप पंचनामे करणे बाकी असतानाच गुरुवारी रात्री जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला.

शहर व परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात झालेल्या गारपीटीच्या व अवकाळी पावसातमुळे हातात आलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान झाले आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पुढचे 16 ते 18 मार्च असे तीन दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत.

वादळी वारे व विजा चमकत असताना नागरिकांनी विद्युत उपकरणे वापरू नये तसेच शेतीचे नुकसान होणार नाही यासाठी शेती माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा ,असे आवाहन गुरुवारी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे