आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:महाराष्ट्राचा इतिहास अनेकांच्या कौतुकाचा, स्वाभिमानाचा व प्रेरणेचा; प्रा. नितीन बानगुडे यांचे प्रतिपादन

कोपरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचा इतिहास हा अनेकांच्या कौतुकाचा, स्वाभिमानाचा, प्रेरणेचा, अनेकांना प्रोत्साहन देणारा आहे. हा इतिहास जर वर्तमानात पाठिशी घेतला तर भविष्यकाळात सुधारणा करता येतील, असे प्रतिपादन प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.

कोपरगाव शहरातील बाबासाहेब आंबेडकर मैदानावर शिवजन्मोत्सव सोहळा २०२२ कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्यातील तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमात नितीन बानगुडे बोलत होते. यावेळी यावेळी जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे, जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे, जि. प. सदस्य राजेश परजणे, पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील, युवसेना विस्तारक सुनील तिवारी, किरण बिडवे, युवानेते विक्रांत झावरे, विशाल झावरे, शहर प्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, ग्राहक संरक्षक जिल्हाप्रमुख मुकुंद सिनगर, काँगेस तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, शिववाहतूक सेनेचे जिल्हाप्रमुख इरफान शेख शिवजन्मोत्सव अध्यक्ष शेखर कोलते, दत्तू पगारे, शिवसेना सचिव बाळासाहेब साळुंके आदी उपस्थित होते. बानगुडे म्हणाले, शिवरायांनी स्वतःच्या सुरक्षिततेपेक्षा रयतेची सुरक्षा महत्त्वाची, हा संदेश देत ते पुढे चालत राहिले. स्वराज्य आले तर रयत सुरक्षित हे शिवरायांनी जाणले होते.

बातम्या आणखी आहेत...