आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेजातील संज्ञापन अभ्यास विभागातर्फे आयोजित १५ व्या ‘प्रतिबिंब- राष्ट्रीय लघुपट व माहितीपट महोत्सवात खुल्या गटात लातूर येथील विक्रम बोळेगावे दिग्दर्शित ‘महासत्ता’ तर विद्यार्थी गटामध्ये पुणे येथील अतुल झांजड दिग्दर्शित ‘उंबरा’ हे लघुपट सर्वोकृष्ट ठरले. ओरिसा येथील अंकितकुमार साहू व ओमप्रकाश रौत्राय दिग्दर्शित ‘रघुराजपूर : द लँड ऑफ आर्टीसन्स’ या माहितीपटाला प्रथम क्रमांक मिळाला.
परीक्षक म्हणून राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त प्रा. मिथुनचंद्र चौधरी आणि प्रसिद्ध चित्रपट संकलक टीन्नी मित्रा हे उपस्थित होते. या महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा राजर्षी शाहू महाराज सभागृहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे होते. संज्ञापन विभागाचे प्रमुख प्रा. संदीप गिऱ्हे यांनी प्रास्ताविक केले.
जी. डी. खानदेशे म्हणाले, या विभागामुळे मराठी चित्रपट इंडस्ट्री अहमदनगरला येत आहे. कमी पैशात इथे लोकेशन्स, कलाकार व साधने उपलब्ध होतात असेही ते म्हणाले. यावेळी प्राचार्य बी. एच. झावरे, प्रा. मिथुनचंद्र चौधरी आणि टीन्नी मित्रा यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. परीक्षकांनी प्रत्येक विजेत्या लघुपट व माहितीपटाबाबत आपण त्याची निवड का केली याबाबत मत व्यक्त केले.
या महोत्सवाचे संयोजक प्रा. अभिजीत गजभिये यांनी पाहुण्यांचा परिचय व पारितोषिकांची घोषणा केली. सूत्रसंचालन रामदास घुटे यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. बी. बी. सागडे, डॉ. ए. ई आठरे, रेसिडेन्शियल विद्यालयाचे प्राचार्य व्ही. के. पोकळे, विविध विषयाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व शहरातून चित्रपट प्रेमी बहुसंख्याने उपस्थित होते. विजेत्यांना सन्मान चिन्ह, सन्मानपत्र व रोख पारितोषिके देण्यात आली. चार दिवस प्रेक्षकांना दुर्मिळ सिनेमे पहायला मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.