आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विम्याचा फायदा:मैड हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य विमा

शिर्डी3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य विमा व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत पंतप्रधान जीवनदायी आरोग्य विमा या दोन योजनांचा शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते डॉ. मैड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये करण्यात आला. डॉ. संतोष मैड यांनी सुरू केलेल्या दोन्ही योजनेमुळे पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारकांना या आरोग्य विम्याचा फायदा होईल. गरजू रुग्णांची मोफत विविध शस्त्रक्रिया होणार असल्यामुळे रुग्णांची इतरत्र जाण्याची धावपळ कमी होईल, असे महसूलमंत्री विखे म्हणाले.

लोणी येथे या दोन्ही योजनांच्या नामफलकाचे अनावरण विखे यांनी केले. यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉ. संतोष मैड, गणेश मैड, डॉ. शिवानी मैड, अक्षद मैड, शुभम पवार, निखिल खर्डे, बाळासाहेब बोराडे यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. मैड म्हणाले, तज्ञ डॉक्टरांची टीम एकत्र करून राहात्यात अत्याधुनिक डॉ. मैड मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलची उभारणी केली. गरजू रुग्णांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करून विविध शस्त्रक्रिया करण्याची सुविधा उपलब्ध केली. या दोन्ही योजनांमुळे पिवळे व केशरी रेशनकार्ड असलेल्या गरजू रुग्णांना जनरल सर्जरी, नाक, कान, घसा, स्त्रीरोग, अस्तिरोग, नवजात शिशु, मेंदू विकार प्लास्टिक सर्जरी अशा आजारावर उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातील. काही महिन्यातच हृदय शस्त्रक्रिया विभाग सुरु होणार आहे. या ठिकाणी अँन्जिओग्राफी व अँन्जोप्लास्टी सुविधा असेल.

बातम्या आणखी आहेत...