आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेळावा:महाविकास आघाडी सरकार विश्वासघातकी ; भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांचा आरोप

नगर19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यातील आघाडी सरकार विश्वासघातकी आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा व ओबीसी समाजांचे हक्काचे आरक्षण गेले आहे. असा आरोप बुधवारी भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार योगेश टिळेकर यांनी करतानाच नगर शहराचा पुढील आमदार व महापौर भाजपचाच होईल यासाठी ओबीसी समाज पूर्ण ताकदीने काम करेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने आयोजित केलेल्या ओबीसी समाजाच्या जागर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी खासदार सुजय विखे, माजी जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, मेळाव्याचे संयोजक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर डागवाले, महामंत्री शंकर वाघ, शहर ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे,उत्तर जिल्हाध्यक्ष संतोष रायकर, संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, विवेक नाईक, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, मालन ढोणे, बाळासाहेब महाडीक, ओंकार लेंडकर, समन्वयक बाळासाहेब भुजबळ, प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, शंकर वाघ, युवराज पोटे आदी यावेळी उपस्थित होते. टिळेकर म्हणाले, आज जर ओबीसी समाज जागृत होऊन पेटून उठला नाहीतर भविष्यात शिक्षण व नोकरी मधील आरक्षणही हे विश्वासघातकी सरकार घालवेल. असा आरोप त्यांनी केला.या शहराचा पुढील आमदार व महापौर भारतीय जनता पक्षाच होण्यासाठी ओबीसी समाज पूर्ण ताकदीने काम करेल. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. महेंद्र गंधे म्हणाले, भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालयाची स्थापना करून मोठे काम केले. पण या सरकारने ते बंद पडली. आपल्या चांगल्या भविष्यासाठी ओबीसी समाजाने भाजपच्या झेंड्याखाली एकत्र यावे. प्रास्ताविकात संयोजक किशोर डागवाले म्हणाले, आघाडी सरकाची आरक्षण देण्याची मानसिकता नाही. ओबीसी समाजाचे आरक्षण गेल्यापासून फक्त भाजपच पूर्ण राज्यात आक्रमक भूमिका घेत आंदोलने करत आहे. असे ते म्हणाले. ओबीसी समाज भाजपाचा आत्मा आहे. आडनावावर ओबीसी ठरवणे अशक्य आहे. त्यामुळे ओबीसी समाजाला हक्काचे आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी येणाऱ्या काळात भाजप अधिक आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरेल असा इशारा टिळेकर यांनी यावेळी दिला.

बातम्या आणखी आहेत...