आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणविरोधात संताप:500 ते 600 रुपयांची बिले 60 हजारांवर, शेकडो वीजग्राहकांचे रास्ता रोको आंदोलन

अहमदनगर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घरगुती ग्राहकांना महावितरणने ५० ते ६० हजार रुपयांचे बिले देवून वसुली सुरु केली आहे. बिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीजतोडणी केली जात असल्याच्या निषेधार्थ निघोज एसटी बसस्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, सोशल मीडियाचे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जितेश सरडे, उपसरपंच माऊली वरखडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

बिलांमध्ये प्रचंड तफावत

आंदोलकांनी सांगितले की, गेल्या 2, 3 महिन्यांपासून बिलात मोठी तफावत आढळत आहे. ज्या वीज ग्राहकांचे बिल पूर्वी महिन्याला ५०० ते ६०० रुपये येत होते. त्यांना आज ५० ते ६० हजार रुपयांचे बिल येत आहे. अनेकांच्या मीटरमध्ये दोष आहेत. याबाबत बहुतांश विज ग्राहकांनी तक्रारी केल्या होत्या. महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र अधिकारी आहे त्या बिलावर ठाम राहिले. तर बिल भरले नसल्याचे कारण दाखवून विज कर्मचाऱ्यांनी वीज तोडण्याची मोहीम हाती घेतली होती.

आंदोलनस्थळी दोन तासांनी उपकार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई यांनी लेखी आश्वासन दिल्याने रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी आळकुटीचे चेअरमन बाळासाहेब पुंडे, माजी सरपंच संतोष शिनारे, गारखिंडींचे चेअरमन धोंडिभाउ झिंजाड, म्हस्केवाडीचे सरपंच किरण पानमंद, शिवाजीराव डेरे, सोमनाथ वरखडे आदी उपस्थित होते.

बिल तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष

३ रुपये ६३ पैसे दराने सरसकट विज‌आकारणी करीत निघोज येथील कार्यालयात बिल तपासणीसाठी एक स्वतंत्र कक्ष सुरू करुन ग्राहकांवरील अन्याय दूर करण्यात येईल, असे लेखी आश्वासन उपकार्यकारी अभियंता प्रशांत आडभाई यांनी दिल्यानंतर दोन तासांचा रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...