आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:दिवाळीनिमित्त माहेरी आली अन् बेपत्ता झाली

नगर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळी सणानिमित्त माहेरी आलेली विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना नगर शहरातील एका उपनगरात घडली. त्या विवाहितेच्या वडिलांनी या प्रकरणी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून नोंद करण्यात आली आहे.

फिर्यादीच्या मुलीचे लग्न शेवगाव तालुक्यातील एका गावातील मुलासोबत एक वर्षापूर्वी झाले होते. दरम्यान, फिर्यादी यांची मुलगी सासरी नांदत असताना दिवाळी सणानिमित्त माहेरी नगर येथे आली होती. ती ४ नोव्हेंबर पासून बेपत्ता झाली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तिचा शोध कोतवाली पोलिस घेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...