आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:ग्रामपंचायत निवडणुकीत कायदा, सुव्यवस्था राखा ; रामराव ढिकले

श्रीगोंदे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील दहा गावा पैकी नऊ ग्रामपंचायत निवडणुका शेवटच्या टप्प्यात आलेल्या असून निवडणुकांसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी करत संवेदनशील असलेल्या काष्टी परिसरासह इतर गावात पोलिस संचलन केले.

ग्रामपंचायत निवडणुका शांततेच्या मार्गाने होवून गावात कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली. निवडणुकीत गोंधळ घालणारांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. निवडणूक काळात गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था अबधित राहून शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने संवेदनशील असलेल्या काष्टी गावासह इतर ठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांसह संचलन करत पाहाणी केली.

बातम्या आणखी आहेत...