आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरट्यांचा धुमाकूळ:नगरमधील सावेडी परिसरात जबर घरफोडी; राहत्या घरातून 41 तोळे सोन्याचे दागिने लंपास

अहमदनगर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भिस्तबाग चौक परिसरातील सुदर्शन हौसिंग सोसायटीत चोरट्यांनी राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत तब्बल 41.50 तोळे सोन्याचे दागिने व 10 हजारांची रोख रक्कम लंपास केली. शनिवार 11 जून रोजी ही घटना उघडकीस आली. दरम्यान या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कार्यक्रमात हातसफाई

अभिजीत अरविंद गर्गे (वय 55) यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. नातीच्या नामकरणाचा कार्यक्रमाचा असल्याने घरी नातेवाईकांची लगभग होती. नेहमीप्रमाणे काम करणारी सय्यद भाभी ही काम करण्यासाठी वळेवर घरी आली. असे असताना घराचा किचनचा दरवाजा बाहेरून लावला असल्याचे पाहायला मिळाले. तसेच किचनमध्ये ठेवलेल्या तीन ते चार बॅग घराच्या कम्पाउंडमध्ये पडलेल्या दिसल्या. घराची पाहणी केली असता किचनच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून बॅगमधील 41.50 तोळे सोन्याचे दागिने लंपास झालेले होते.

पोलिसांचा तपास सुरू

तोफखाना पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी हजर झाले. घटनास्थळाची पाहणी करुन तपास सुरू करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...