आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योगदान:सामाजिक क्षेत्रात रोटरीचे मोठे योगदान : जगताप

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जगात आरोग्याच्या व पर्यावरणाच्या समस्या आहेत. रोटरी क्लबने दोन्ही ठिकाणी काम करून या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले. जेव्हा संकटे येतात, तेव्हा सर्वात पहिले उभे राहणारी रोटरी संस्था आहे. नगरमध्येही रोटरी मिडटाउन क्लबने मोठे सामाजिक कार्य उभारले आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

प्रत्येक दुर्लक्षित व गरजूपर्यंत क्लब पोहचून त्यांना मदत करीत आहे. अशा सामाजिक कामांचा दृढनिश्चय करून अमलबजावणी करणाऱ्या रोटरी मिडटाऊन क्लबच्या विविध कामांसाठी लवकरच महापालिकेच्या माध्यमातून मोकळी जागा उपलब्ध करून देवू, असे आश्वासन आमदार जगताप यांनी दिले.

रोटरी क्लब मिडटाउनचे नूतन अध्यक्ष ज्येष्ठ रंगकर्मी सतीश शिंगटे व सचिव तुषार देशमुख यांनी आमदार जगताप यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला. मावळत्या अध्यक्षा किरण कालरा यांच्याकडून शिंगटे यांनी तर कल्पना गांधी यांच्याकडून नूतन सचिव तुषार देशमुख यांनी पदभार घेतला.

यावेळी रोटरीचे प्रांतपाल रुख्मेश जाखोटिया, सहाय्यक प्रांतपाल गीता गिल्डा आदींसह रोटरी क्लबचे पदाधिकारी व ज्येष्ठ व नवे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रांतपाल रुख्मेश जाखोटिया म्हणाले, ११७ वर्षांपासून रोटरी क्लबचे २३० देशांमध्ये ३७ हजार क्लब काम करत आहेत.

भारतात ४७५ क्लब असून सुमारे दीडलाख सदस्य आहेत. नगर मध्ये ३७ वर्षापासून रोटरी क्लब मिडटाऊनचे अखंडितपणे काम चालू आहे. जगात पोलिओ निर्मुलासाठी जसा पुढाकार रोटरीने घेतला तसाच पुढाकार करोनाच्या उच्चाटनासाठी क्लबने पुढाकार घेतला.

बातम्या आणखी आहेत...