आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचा सत्कार:माका विद्यालयाची विद्यार्थिनी एसएससी परीक्षेमध्ये नेवासे तालुक्यातून प्रथम

सोनई3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यू इंग्लिश स्कूल माका विद्यालयातील एसएससी व एचएससी परीक्षा मार्च २०२२ या परीक्षेमध्ये गुणानुक्रमे प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा तसेच एसएससी परीक्षा मार्च या परीक्षेत नेवासे तालुक्यामध्ये सर्वप्रथम आलेल्या भक्ती दत्तात्रय घुले ९६ टक्के हिचा सत्कार करण्यात आला.

माका गावचे सरपंच नाथाजी घुले, मुळा एज्युकेशन संस्थेचे प्रशासन अधिकारी डॉ. अशोकराव तुवर यांच्या हस्ते सन्मान झाला. याप्रसंगी माका सोसायटीचे चेअरमन डॉ. रघुनाथ पागिरे, व्हाईस चेअरमन जबाजी पांढरे, मल्हारी आखाडे, ॲड. अरुणराव पालवे, कारंडे, अतुल पोकळे, संजय गाडे, माजी संचालक एकनाथ जगताप, माजी उपसरपंच यादवराव शिंदे, माजी सरपंच एकनाथ भुजबळ, ग्रामपंचात सदस्य पत्रकार आदिनाथ म्हस्के, सत्यवान पटेकर आदी उपस्थित होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी शिक्षणाची दारे खुली केली, असे डॉ. तुवर यांनी सांगितले. स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डी. आर. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन विक्रम चौधरी यांनी केले. आभार व समारोप पर्यवेक्षक पांडुरंग सोनवणे यांनी केले.

संस्थेची विद्यार्थीनी प्रथम आल्याचा अभिमान गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी मुळा एज्युकेशन सोसायटी नेहमी अग्रेसर आहे. नेवासे तालुक्यातील माका विद्यालयातील विद्यार्थिनी एसएससी परीक्षेत नेवासे तालुक्यातून प्रथम आली, याचा मनस्वी आनंद व अभिमान आहे, असे मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदयन गडाख यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...