आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी‎:ड्रेनेजमधील सांडपाणी सीना नदीत‎ सोडण्याऐवजी स्वतंत्र व्यवस्था करा‎

नगर‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व परिसराच्या ग्रामीण भागातील‎ मैलामिश्रित सांडपाणी सरसकट सीना‎ नदीत सोडण्यात येते. त्यामुळे नदी प्रदूषित‎ झाली असून, नागरिकांचे आरोग्याचा प्रश्न‎ निर्माण झाला आहे. पर्यावरणाचा विचार‎ करता, मैलामिश्रित सांडपाणी थेट नदीत न‎ सोडता शहराच्या बाहेर मोठा‎ तलावासारखा हौद करुन त्यात हे‎ मैलामिश्रित सांडपाणी साठवण करुन‎ ठेवावे.

त्यावर प्रक्रिया करुन पाण्याचे‎ शुद्धीकरण करावे. त्यानंतर ते‎ जवळपासच्या शेतीला देता येईल. तसेच‎ हौदात साचलेला गाळ, मातीपासून खत‎ निर्माण करण्याची प्रक्रिया राबवावी, अशी‎ मागणी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष‎ बाळासाहेब भुजबळ व ओबीसी‎ जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारे‎ यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने केली.‎ मनपा आयुक्त पंकज जावळे यांना‎ याबाबत निवेदन देण्यात आले.‎ शिष्टमंडळात सर्वश्री भुजबळ, राजाभाऊ‎ पडोळे, श्रींकात मांढरे, सुनील‎ भिंगारे,कुंडलिक गदादे, रमेश बिडवे,वैभव‎ पालवे, फिरोज खान, रमेश सानप, माऊली‎ गायकवाड,योगेश पिंपळे, रुपाली पुंड,‎ ज्योती घोरपडे आदी सहभागी झाले होते.‎

बातम्या आणखी आहेत...