आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:श्री वीरभद्र ट्रस्टच्या निवडी घटनेनुसार करा; राहाता शहरातील नागरिकांची मागणी

राहाता9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहाता येथील श्री वीरभद्र सार्वजनिक देवालय उत्सव ट्रस्टच्या सभासद नोंदणी बाबत कार्यवाही करुन घटनेनुसार निवडी कराव्यात, अशी मागणी राजकुमार अग्रवाल व राहाता शहरातील काही नागरिकांनी सहाय्यक धर्मादाय आयुक्त अहमदनगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहेसहाय्यक धर्मादाय आयुक्तांना पाठवलेल्या निवेदनात राजकुमार अग्रवाल व इतर नागरिकांनी म्हटले आहे की राहाता शहरातील श्री वीरभद्र सार्वजनिक देवालय उत्सव ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाचा कार्यकाळ नुकताच संपलेला आहे नवीन विश्वस्त मंडळाच्या निवडीसाठी शुक्रवारी (२५ नोव्हेंबर) ग्रामसभेची तारीख निश्चित केलेली आहे सन १९५३ साली नोंदणी झालेल्या या ट्रस्टमध्ये ग्रामसभेतून विश्वस्त मंडळ नेमण्याची परंपरा होती. परंतु सन १९८७ मध्ये राहाता नगरपरिषद अस्तित्वात आलेली आहे तरी सुद्धा सदर विश्वस्त निवडीसाठी ग्रामसभा बोलवण्यात येते परंतु प्रत्येक वेळी त्या ग्रामसभेचे अध्यक्ष व ठराविक पुढारी यांच्या संगनमताने पक्षपातीपणे विश्वस्तांची निवड केली जात असल्याचा आरोप करून ही बाब चुकीची असल्याचे अग्रवाल यांनी म्हटले आहे.

राहाता शहर हे तालुक्याचे ठिकाण व येथे नगरपरिषद अस्तित्वात असताना ग्रामसभेमधून विश्वस्तांची निवड करणे कितपत योग्य आहे असा सवालही या निवेदनात उपस्थित करण्यात आला आहे .मुंबई सार्वजनिक ट्रस्ट मुंबई अधिनियम १९५० च्या कायद्यानुसार सदर ट्रस्टमध्ये सभासदांची नोंदणी करणे व त्या सभासदांमधून विश्वस्त मंडळाची निवड करणे कायद्याने अभिप्रेत आहे. परंतु याबाबत कारवाई झालेली दिसत नाही. अलीकडच्या काळात शहरातील एकाही ग्रामस्थास वीरभद्र देवस्थानचा सभासद होता आले नाही, याची खंतही व्यक्त करण्यात आल.

राहाता येथील वीरभद्र देवस्थान ट्रस्टच्या सभासदांच्या नोंदणीबाबत आदेश होऊन संविधानिक अधिकारात सभासदांची नोंदणी प्रक्रिया तात्काळ सुरू करावी प्रशासक नेमणूक कायदेशीर बाबीची पूर्तता करण्यात यावी अन्यथा आम्ही अहमदनगर येथील धर्मादाय आयुक्त कार्यालय समोर विविध प्रकारचे आंदोलन करू व गरज पडल्यास योग्य त्या न्यायालयात दाद मागू असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राजकुमार अग्रवाल ,माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने, शशिकांत लोळगे, गणेश सोमवंशी, दीपक सोळंकी, अनिल पावटे, भानुदास गाडेकर, नंदकुमार सदाफळ, अनिकेत तुपे, अनिल सोमवंशी ,राजेंद्र पाळंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...