आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रद्धांजली:समाजासाठी काम करणारा इतिहास घडवतो : आमदार लंके

पिंपरणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात ज्यांनी माणसात देव बघून काम केले. त्यांच्या नावाची नोंद इतिहासात निश्चितच होईल. संकट काळात समाजासाठी, गोरगरिबांसाठी काम करण्यातचं आगळे वेगळेपण असते. त्यातूनचं आपले पण निर्माण होते. जो स्वतःसाठी जगतो त्याची माती होते, तर समाजासाठी जगणाऱ्यांची इतिहासात नोंद झाली, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

संगमनेर तालुक्यातील शिबलापूर येथील काळू उर्फ संजय मुन्तोडे मित्र मंडळाने कोरोना काळात मृत्यू झालेल्याची घेण्यात आलेल्या सामुहिक श्रद्धाजंली कार्यक्रमा प्रसंगी आमदार लंके बोलत होते. यावेळी पठार भागाचे नेते गुलाबराव भोसले, अर्जुन मुन्तोडे, अनिल कोळपकर, संजय मुन्तोडे, दिनकर बोंद्रे, संदीप बोंद्रे, संतोष मुन्तोडे आदी उपस्थित होते. आमदार लंके म्हणाले, कोरोनात मृत्यू पावलेल्यांना सामुहिक श्रद्धाजंलीचा उपक्रम स्तुत्य आहे. असा उपक्रम कोणीही आजपर्यत घेतला नाही. कोरोना काळात मृत्यू पावलेल्या नातेवाईकांना भविष्यात काही अडचणी निर्माण झाल्या, तर सांगा अडी अडचणी दूर करू, असे आश्वासन आमदार लंके यांनी दिले.

बातम्या आणखी आहेत...