आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानक:माळीवाडा, तारकपूर ,सावेडी बसस्थानक बीओटी तत्त्वावर विकसित होणार : विखे

नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील शहरातील तारकपूर व माळीवाडा,सावेडी बसस्थानक व श्रीरामपूर बस स्थानक बीओटी तत्त्वावर विकसित करण्यासाठीचा प्रस्ताव महामंडळाकडे पाठवण्यात आला अाहे. त्यास मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी सोमवारी सांगितले. नगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री विखे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पंडीत जवाहरलाल नेहरु सभागृहात पार पडली.

त्यावेळी ते बोलत होते. खासदार डॉ.सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, आमदार किशोर दराडे, आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार मोनिका राजळे, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, आमदार किरण लहामटे, आमदार आशुतोष काळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनित पाऊलबुध्दे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपायुक्त नियोजन प्रदीप पोतदार, निवासी उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, नियोजन अधिकारी नीलेश भदाणे आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावांवर विभागांनी कार्यवाही करुन कामे वेळेत पूर्ण करावी. यासाठी सर्व खातेप्रमुखांनी ताळमेळ ठेवून कार्य करावे.

बातम्या आणखी आहेत...