आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या वासुंदे (ता. पारनेर) येथील इलेक्ट्रीक टॉवरची अॅल्युमिनिअम तार चोरी करणारा व विकत घेणारा अशा दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले. श्रीकांत ऊर्फ शिरक्या फकिरा मनतोडे (वय २०, रा. आश्वी खु. ता. संगमनेर) व फारूख युसूफ सय्यद (वय २८, रा. जुने जोर्वे रोड, संगमनेर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ३ हजार ३९० रूपये किमतीची ४९० किलो तार जप्त केली. श्रीकांत मनतोडे याचे दोन साथीदार मात्र पोलिसांना सापडले नाहीत. शरद ऊर्फ गोट्या पर्वत (रा. दाढ ता. राहाता) व नरेंद्र ऊर्फ नऱ्या पंढरीनाथ इंगळे (रा. आश्वी ता. संगमनेर) अशी त्यांची नावे आहेत. १९ जुलै रोजी कंपनीचे सुपरवायझर विभाष कुमार महतो यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दिली होती. हा गुन्हा श्रीकांत मनतोडे याने केला असून तो राहत्या घरी आल्याची माहिती निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.