आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालक मेळावा:श्रीगोंदे शुगर शाळेत व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन कार्यक्रम ; पालकांची बिनविरोध मान्यता

श्रीगोंदे21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीगोंदे शुगर येथे शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यासाठी पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्य नानासाहेब ससाणे हे होते. या पालक मेळाव्यात उपस्थित पालकांनी सर्वानुमते सदस्य निवड केली. ह्या सदस्य निवडीला सर्व पालकांनी व ग्रामस्थांनी बिनविरोध मान्यता दिली. निवड करण्यात आलेल्या सदस्यांमधून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष म्हणून प्रदीप कोकाटे यांची तर उपाध्यक्ष म्हणून दत्तात्रय घालमे यांची निवड करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत लिंपणगावचे सरपंच उदयसिंह जंगले, डॉ. दत्तात्रय गायकवाड, माजी शा. व्य. समिती अध्यक्षा कल्पना कांबळे, माजी उपाध्यक्ष सुरेश पवार, माजी अध्यक्ष शशिकांत कोकाटे, अशोक कोकाटे, संदीप कोकाटे, मधुकर काळाणे असे मोठ्या संख्येने पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. माजी अध्यक्ष कल्पना कांबळे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच या समितीची विविध पदे म्हणजे शोभेची पदे नसून त्यागाची आहेत असे सांगितले. माजी उपाध्यक्ष सुरेश पवार यांनीही आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...