आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शैक्षणिक:प्रगतीची शिखरे गाठण्यासाठी मनशक्तीचे द्वार उघडणे गरजेचे, जिल्हा परिषद शाळा मनेगाव येथे आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात मांईड ट्रेनर विलास दिघे यांचे प्रतिपादन

कोपरगाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रगतीचे उत्तुंग शिखरे पादाक्रांत करण्यासाठी आपल्या मनाच्या शक्तीचे दरवाजे उघडणे गरजेचे असते, असे प्रतिपादन मांईड ट्रेनर विलास दिघे यांनी केले. जिल्हा परिषद शाळा मनेगाव येथे आठवीच्या शुभेच्छा समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध प्रात्यक्षिकामधून स्मरण शक्तीच्या विकासाबाबत अनेक दाखले दिले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भिकाजी झिंजुर्डे होते. प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दिलीप गडाख यांनी केले.

याप्रसंगी शाळेत राबवला जाणाऱ्या अवांतर वाचन स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत इयत्ता आठवीच्या श्रावणी कोल्हे हिने प्रथम क्रमांक, तर आदर्श विद्यार्थी म्हणून तेजस्वी कालेवार व सुरज रणदीर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला लोखंडी कपाट भेट म्हणून दिले. शाळेतील शुभम आढाव या विद्यार्थ्याला भेट वस्तू प्रदान केली. याप्रसंगी शाळेतील माजी शिक्षक नानासाहेब देव्हारे यांनी मुलांना मार्गदर्शन केले. गावातील माजी सैनिक युवराज गांगवे यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाचे कौतूक केले. अवांतर वाचन स्पर्धेत श्रावणी कोल्हे, संस्कृती गांगवे, अमृता आढाव, कल्याणी गोऱ्हे, दिव्यानी माळी, जान्हवी आढे, अनुज गोऱ्हे, राजवर्धन खालकर या विद्यार्थ्यांनी बक्षिसे मिळवली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्कृती गांगवे व ऋतुजा गोऱ्हे यांनी केले. धनंजय कोल्हे व पूजा गोऱ्हे यांनी आपल्या मनोगतातून शाळेविषयी व शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. शाळा व्यवस्थापनचे अध्यक्ष भिकाजी झिंजुर्डे, युवराज गांगवे, वैजनाथ गोऱ्हे, जनार्दन गोऱ्हे, श्याम लहामगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना गोड भोजनाची व्यवस्था कचरू मोरे व सुमन माळी यांनी केली.

कार्यक्रम व्यवस्थित होणेसाठी शाळेतील सर्व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक दिलीप गडाख, शोभा डावरे, सुखदेव मोहिते, कैलास रामकर, संतोष दिवे, आशा दिघे यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी केला.

बातम्या आणखी आहेत...