आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठा उत्साह:गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक व्हावा याबाबत मंडळांनी जनजागृती करावी ; जावळे

नगर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव हा सर्व घटकांना आनंद देणारा उत्सव आहे, श्री गणेशाच्या आगमनाने सर्वांमध्ये मोठा उत्साह आहे. उत्सव हे आपल्या जीवनाला दिशा देणारे आहेत, ते त्याच पद्धतीने साजरे झाले पाहिजे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबरोबरच आपल्या परिसराची स्वच्छता राखली पाहिजे. मनपाच्यावतीने घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवात जागृती करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक मंडळांसाठी विविध विषयांवर देखावे स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या स्पर्धेतही सर्वांनी सहभाग नोंदवा, असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी केले. भिस्तबाग नाका येथील कजबे वस्ती परिसरातील पुण्यश्लोक तरुण मंडळाच्या श्री गणेशाची आरती आयुक्त डॉ. जावळे यांनी केले. याप्रसंगी निशांत दातीर, कुणाल जयकर, उद्योजक संतोष भंडारी, अंकुश गावडे, इंजि.डि.आर.शेंडगे, प्रा.विष्णू बारगळ, दत्तात्रय सोलाट, अमोल काळे, डॉ.शाम डौले, दिलीप गुंजाळ, हेमंत कुटे, विलास शेळके, कौस्तुभ बिडकर, अमोल बामदळे, चंद्रशेखर शिरसाठ, आसाराम देसाई, रेणुकादास ठोंबरे, संजय नाईकवाडे, दत्तात्रय सुरम, बाळासाहेब थोरात, चंद्रकांत वाव्हळ, जगदीप सानप, गणेश भोर, दीपक पाटील, विवेक कुलकर्णी, राहुल कडूस, रघुनाथ महारनवर, सुचित शिंदे आदि उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...