आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:मच्छिंद्रनाथांचा प्रकट दिन उत्साहात

पाथर्डीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नाथ सांप्रदायाचे आद्य चैतन्य मच्छिंद्रनाथांनी ऋषिपंचमी दिवशी अवतार घेतला. त्यांची संजिवन समाधी असलेल्या मायंबा येथे मच्छिंद्रनाथांचा प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे, नाशिक, कल्याण यासह विविध भागांतून नाथ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.देवस्थान समिती व भाविकांच्या उपस्थति मच्छिंद्रनाथांच्या संजिवन समाधी व मुर्तीची पहाटे महापुजा होऊन जन्मोत्सवास प्रारंभ झाला. पैठण वरून आणलेल्या गंगेच्या पाण्याने मच्छीद्रनाथांच्या संजवन समाधीचा जलाभिषेक करण्यात येऊन नवनाथ ग्रंथातील अवतार प्रकट होण्याच्या अध्यायाचे वाचन करण्यात आले .यावेळी हभ प अशोक महाराज मरकड, देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे, जयदत्त धस, सचिव बाबासाहेब म्हस्के, विश्वस्त रमेश ताठे, अनिल म्हस्के, देवस्थानचे उपाध्यक्ष बाबासाहेब म्हस्के, सरपंच राजेंद्र म्हस्के, अर्जुन म्हस्के, भरत भगत, नवनाथ म्हस्के आदी उपस्थित होते.

फटाक्यांची आतषबाजी ढोल ताशाचा निनादाने परिसर दुमदुमुन गेला होता. पुणे, नाशिक, बारामती, नगर विभागातून मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी झाले होते. स्थानिक महिला भजनी मंडळाच्या सदस्यांनी जन्माचा पाळण्याचे गायन करत विविध मान्यवरांच्या हस्ते पाळणा हलवण्यात आला. शेंडगेवाडी, सावरगाव येथील भजनी मंडळाच्या उपस्थितीत नाथांच्या अश्वाची परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. मच्छिंद्रनाथांची संजिवनी समाधी मंदीराचा गाभारा ,सभामंडप , तसेच सर्वच ठिकाणी विविध रंगांच्या आकर्षक फुले, फळे व फुग्यांनी वैशिष्ट्यपूर्ण केलेली सजावट भाविकांचे लक्ष वेधत होती.

बातम्या आणखी आहेत...