आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायलॉन मांजाची विक्री:पोलिसांकडून मांजा जप्त; मनपा पथक रिकाम्या हाती

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नायलॉन मांजाची विक्री करत असलेल्या दुकानावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच दुकानदार पळून गेला. पोलिसांनी दुकानातून १३ हजार ३०० रुपये किमतीचा चायना मांजा जप्त केला. ही कारवाई माळीवाडा येथील वरवंडे गल्ली येथे करण्यात आली. दरम्यान, पोलिसांना चायना मांजा सापडत असताना दुसरीकडे महानगरपालिकेची पथके दिवसभर तपासणी करून रिकाम्या हाताने परतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नगर शहरातील माळीवाडा येथे प्रथमेश राजू करपे (रा. वरवंडे गल्ली,माळीवाडा) हा नायलॉन मांजाच्या विक्री त्याच्या घराजवळ करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक सोपान गोरे, अंमलदार संदीप घोडके, संदीप पवार, रवींद्र घुंगासे, मयूर गायकवाड, योगेश सातपुते, कमलेश पाथरूट यांच्या पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या.

पोलिसांनी गुरूवारी (५ जानेवारी) सायंकाळी छापा टाकला असता नायलॉन मांजा विक्री करणारा पळून गेला. अंमलदार ससाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून प्रथमेश करपे याच्याविरूध्द कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवाली पोलिस अधिक तपास करत आहेत. महानगरपालिकेच्या पथकांकडूनही शहरात विविध ठिकाणी दुकानांमध्ये छापे टाकून तपासणी होत आहे. मात्र, अद्याप एकही तपासणीत मनपाच्या पथकाला यश आले नाही. दुसरीकडे शहरात मात्र चायना मांजाचा वापर सर्रास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...