आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षपद:शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनोज गुंदेचा ; अध्यक्ष पदासह कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवडणूक

नगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या पक्षांतर्गत संघटनात्मक निवडणुका सध्या सुरू आहे. नगर शहर ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष पदासह कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांची निवडणूक झाली. यावेळी शहर ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मनोज गुंदेचा यांची बिनविरोध फेरनिवड झाली. विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा प्रभारी अनिस चुडीवाला यांना बढती देत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीसाठी प्रदेश प्रतिनिधी म्हणून निवडण्यात आले आहे. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मान्यतेने ब्लॉक काँग्रेसच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत. शहर काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली.

बातम्या आणखी आहेत...